द्वैराशिकातल्या दोन राशी म्हणजे आम्ही, चिराग आणि आल्हाद. प्राचीन ऑर्कुटीय काळातली महाजालीय मैत्री पुढे प्रत्यक्षातही अवतरली. डोक्यातल्या असंख्य कवीकल्पनांची देवाणघेवाण झाली. अनेक कल्पना हवेत उडून गेल्या पण ही एकत्र ब्लॉगची कल्पना मात्र महाजालावर अवतरली.
आमची प्रत्यक्षाहून प्रतिमा उत्कट असल्याकारणानं अजूनही आम्ही व्हॉट्सॅप, फेसबुक, फोन अशा माध्यमांतूनच अधिक भेटतो. हीच परंपरा सोबत घेऊन ब्लॉगस्पॉट नामक महाजालीय कट्ट्यावर ह्या द्वैराशिकाच्या रूपाने आपल्याला भेटायला आलो आहोत.
आलोच आहोत तर भेटत राहूच!

No comments:
Post a Comment