Friday, 14 February 2014

Happy Valentine's day.

ती:
त्याला बाय करून बसमधे… तो पुढच्या सिग्नलला डावीकडे वळून झूऽऽऽम…
एकमेकांचे हात हातात घेऊन दोघंही शांत बसलो होतो. माझं कुठे लक्ष होतं देव जाणे. कदाचित डोळे मिटूनही घेतले असतील मी. त्यानी घामेजलेला त्याचा हात हातातून कधी सोडवून घेतला,

Friday, 24 January 2014

Wednesday, 22 January 2014

Last seen

तुझं लास्ट सीन चेक करत असताना 
दरवाजा वाजतो काळ आत येतो 
आणि स्क्रोल होत राहतो. 
मी मेसेज टाइप करतो सेंड न करण्यासाठी. 

प्रथमग्रासे

द्वैराशिकातल्या दोन राशी म्हणजे आम्ही, चिराग आणि आल्हाद. प्राचीन ऑर्कुटीय काळातली महाजालीय मैत्री पुढे प्रत्यक्षातही अवतरली. डोक्यातल्या असंख्य कवीकल्पनांची देवाणघेवाण झाली. अनेक कल्पना हवेत उडून गेल्या पण ही एकत्र ब्लॉगची कल्पना मात्र महाजालावर अवतरली.