तुझं लास्ट सीन चेक करत असताना
दरवाजा वाजतो काळ आत येतो
आणि स्क्रोल होत राहतो.
मी मेसेज टाइप करतो सेंड न करण्यासाठी.
डिलीटून परत टाइप करतो
27 वेळा नव्या शब्दांत.
एवढ्यात तुझं लास्ट सीन बदललेलं असतं.
बॅटरी मरे पर्यंत सांत्वनं होत राहतात.
विझलेल्या स्क्रीन वर दिसतो माझा चेहरा
आणि नीट पाहिलं ना,
तर दिसतात गृहितकं
ज्यांच्या खांद्यावर बेमालूम डोकं ठेवलेलं असतं एकेकाळी.
दरवाजा वाजतो काळ आत येतो
आणि स्क्रोल होत राहतो.
मी मेसेज टाइप करतो सेंड न करण्यासाठी.
डिलीटून परत टाइप करतो
27 वेळा नव्या शब्दांत.
एवढ्यात तुझं लास्ट सीन बदललेलं असतं.
बॅटरी मरे पर्यंत सांत्वनं होत राहतात.
विझलेल्या स्क्रीन वर दिसतो माझा चेहरा
आणि नीट पाहिलं ना,
तर दिसतात गृहितकं
ज्यांच्या खांद्यावर बेमालूम डोकं ठेवलेलं असतं एकेकाळी.
:)
ReplyDeleteajun havet - purna feel nahi ala
ReplyDeleteShittttt - नका इतकं परफेक्ट लिहीत जाऊ! :-(
ReplyDelete- सौरभ.